नमस्कार मित्रांनो, मी अभिजीत विलास पातकर, रा. ऐरोली, नवी मुंबई. मी एक Telecom Engineer आहे. मी Abhijeet's Way नावाचा एक ब्लॉग चालू करत आहे. हे चॅनेल चालू करण्याचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे "जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी शिकवावे । शहाणे करून सोडावे । सकळही जण।।" ह्या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मला जे जे काही शैक्षणिक (Educational), सामाजिक (Social) आणि सामान्य ज्ञाना (General Knowledge) संबंधी ठाऊक आहे, ते आपल्या सर्वांना आपल्या मातृभाषेत सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. मला माहिती आहे English ही व्यवहारीक भाषा आहे पण ती लवकर समजण्यात अपयशी ठरतो आणि आपण निराशेच्या आहारी जातो. तुम्हाला वर लिहिल्या प्रमाणे समजलंच असेल की मी मध्ये मध्ये English Words का वापरतो ते. म्हणूनच मी English Words चा वापर करून जे मला काही सांगायचं आहे ते आपल्या मायबोली मराठी मध्ये Explain करणार आहे. त्याचा तुम्हाला पुढे अनुभव येईलच. तरी ह्या कार्यासाठी मला तुमच्या सहकार्यची (support) अपेक्षा आहे आणि तुम्ही मला समजून घ्याल याची खात्री बाळगतो, आणि ह्या कार्याला लवकच सुरवात करतो. धन्यवाद,
No comments:
Post a Comment